जिद्द …
जिद्दीने पछाडलेल्या पाखराची झेप
आकाशाच्याही पलीकडे असते
अशक्य गोष्टही शक्य करण्याची
ताकद त्याच्याकडे असते
इच्छेचे किनारे त्याच्या
कुशीतच असतात
त्याच्या आशा अपेक्षा
इतरांहून वेगळ्या असतात
मागे वळून पाहायला
वेळही नसतो त्याच्याकडे
'' थांबला तो संपला '' हे सूत्र
असतं त्याच्याकडे
पंखात असते त्याच्या
इतकी धार
कि मार्गीचा शत्रूही
होई तडीपार
त्याच्या स्वप्नात अन सत्यात
खुपच कमी अंतर असतं
त्याला अडवणं तर
नियातीच्याही हाताबाहेर असतं
त्याचं कौतुक करायला
हि शब्दमालाही अपुरी पडते
जिद्दीने पछाडलेल्या पाखराची झेप
आकाशाच्याही पलीकडे असते
आकाशाच्याही पलीकडे असते ….
swati krishna8811
जिद्दीने पछाडलेल्या पाखराची झेप
आकाशाच्याही पलीकडे असते
अशक्य गोष्टही शक्य करण्याची
ताकद त्याच्याकडे असते
इच्छेचे किनारे त्याच्या
कुशीतच असतात
त्याच्या आशा अपेक्षा
इतरांहून वेगळ्या असतात
मागे वळून पाहायला
वेळही नसतो त्याच्याकडे
'' थांबला तो संपला '' हे सूत्र
असतं त्याच्याकडे
पंखात असते त्याच्या
इतकी धार
कि मार्गीचा शत्रूही
होई तडीपार
त्याच्या स्वप्नात अन सत्यात
खुपच कमी अंतर असतं
त्याला अडवणं तर
नियातीच्याही हाताबाहेर असतं
त्याचं कौतुक करायला
हि शब्दमालाही अपुरी पडते
जिद्दीने पछाडलेल्या पाखराची झेप
आकाशाच्याही पलीकडे असते
आकाशाच्याही पलीकडे असते ….
swati krishna8811
No comments:
Post a Comment