Pageviews from the past week

Tuesday, 22 December 2015

म्हणजे प्रेम ….

म्हणजे प्रेम …. 

मनाच्या कोपऱ्यातलं
एक छोटंसं रहस्य … 
त्या छोट्याश्या रह्स्याच 
भलं मोठ्ठं विश्व … 

त्या विश्वात रंगलेल्या 
स्वप्नांच्या मैफिली … 
त्या मैफिलीत गायलेली 
विरहाची गाणी … 

त्या गाण्यात पेटणारे 
आठवणींचे सूर … 
त्या सूरात जाणवलेला 
आर्त ओढीचा दाह …   

त्या आर्ततेत तरफडलेल
एक नाजूक फुलपाखरू … 
ज्याचं अखेरीस उरणारं 
अन अमर ठरणार 
स्मित हास्य 
म्हणजे प्रेम … 


swathi krishna 8811 



No comments:

Post a Comment